Saturday, January 16, 2016

Chaitra and Vaishakh

Tigress "Chaitra" travels 80 kilometers for her Tiger "Vaishakh".
Call it love or call it lust. This is phenomenal.
My brief poetic tribute to Chaitra, the Tigress. 

"चैत्रा" आणि "वैशाख"

जाळत होता विरहिणीस
वणवा "वैशाखाचा"
मुक्यामुक्याने पायपीट
आधार अंधाराचा

किती चालली... किती मोडले
पायांमधून काटे
थिजून गेल्या गर्द वनाला
तिची काळजी वाटे

कुठे हरवला साजन वेडा
कि रमला एकलकोंडा?
कि कुठल्याश्या सवतीसोबत
बसला घोळत गोंडा??
.....
तश्यात अवचित भेट घडावी
नजरेला मग नजर भिडावी
कातर हळवा तोही वेडा
पुन्हा नव्याने प्रीत जडावी

अंधारा मग चांदणभूल
आवेगाची उडते धूळ
पहाट जेव्हा दवात न्हाली
तेव्हा विझले वियोगखूळ

पुन्हा पुन्हा मग भेट लाघवी
विरहपीडेचे दिप मालवी
सुकून गेल्या वैशाखाला
पुन्हा नव्याने चैत्र पालवी!

- सौमित्र साळुंके
Copyright @ Saumitra Hanmant Salunke

Loksatta-Chaitra-Tigress-Vaishakh-Tiger-wandering-80 kilometersmaharashtra-news/to-search-a-partner-tigress-wanderings-80-km-in-chandrapur-district-1188457/ 

No comments:

Post a Comment