Saturday, January 9, 2016

When you should NOT watch Natsamrat

When you should NOT watch Natsamrat:

1. If you dislike theater;
2. If you are too conservative, i.e you dislike even the good adaptations of classic literature or plays;
3. If you cannot think of characters in any other colour than black or white;
4. If you are 'okay' with not having watched some epic scenes (including Vikramji-Nana's deathbed scene) on the big screen;
5. If you are averse to accepting the fact that this performance of Nana (and Vikramji) is few light years ahead of any of the Bollywood performances in recent times

......................
लॉ कॉलेजला असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ग्रंथालयात बसून एका बैठकीत संपूर्ण नटसम्राट वाचून काढलं होतं. मी ते नाटक कधी पाहिलं नव्हतं मात्र तात्यासाहेबांच्या शब्दांची जादू अशी आहे कि सर्व पात्र जिवंत झाली होती; माझ्या आजूबाजूलाच नाटक चालू आहे असं वाटत होतं.
माझा नाटकांशी (एकांकिकांच्या रूपाने) काही संबंध असल्याने आणि या कलाप्रकारावर माझं अतोनात प्रेम असल्याने हा चित्रपट चुकवायचा नाही हे निश्चित होतं. त्याला अनुसरून मी शेवटच्या दिवशीच्या शेवटच्या "प्रयोगा"ला हजेरी लावली.

मला हा संपूर्णपणे "Actor's Movie" वाटला. मुळात ज्या कलाकृतीवर हा आधारित आहे ती कलाकृती हिमालयासारखी. त्यात किरण यज्ञोपवीतचे संवाद त्या उंचीला धक्का लागू देत नाहीत. मूळ नाटकातल्या संवादाला जोडून येणारे चित्रपटातले संवाद प्रवाहाला बिलकुल तोडत नाहीत हि मोठी जमेची बाजू आहे.

आता अभिनय...

काय बोलायचे?

नाना आणि विक्रमजींचे एकत्रित प्रसंग अभिनयाचे विद्यापीठ आहेत. मी कैक दिवसांनी थेटरात बायकोच्या बाजूला बसून बायकोपेक्षा जास्त रडलोय. त्यामागे कारण आहे. मला गोखलेंनी खूप रडवलं. मी बरेच म्हणजे खरेच बरेच देशी विदेशी चित्रपट पहिले आहेत (हजारोंच्या घरात). अस्सलपणा असल्याशिवाय मला रडू येत नाही. त्या दोन्ही बाप लोकांनी पुरुषाचं मन ज्या पद्धतीने व्यक्त केलंय त्याला शिरसाष्टांग नमस्कार... दंडवत!!!

संवादातून कळणारी यौवनातली बेफिकिरी, विलासीपणा, सर्वस्व देऊन टाकण्यातला अविचारी उत्स्फुर्तपणा, पत्नीवरचं प्रेम, तीच्यावाचूनचा असहायपणा - पोकळी, नातीवरचा जीव, एकाची पोर नसण्याने आणि दुसऱ्याची पोरं असतानाही आलेली अगतिकता... किती किती म्हणून कंगोरे असावेत??? आणि तेही किती किती खरेपणाने आणि सहजतेने व्यक्त करावेत? राम्याचं हे पात्र नाटकातलं नाही असं वाटतच नाही. कर्ण मृत्युशय्येवर पडलेला असताना युगंधरासोबतचा प्रसंग, to be or not to be ची सोलीलोकी आणि चित्रपट संपल्यानंतरचा संवाद हे चित्रपटातले उच्चतम बिंदू आहेत. आणि याचा पडद्यावर अनुभव घेतल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. एव्हढे मोठे आणि अभिजात आणि पल्लेदार संवाद बोलणे आणि यत्किंचितही भडकपणा न येऊ देता भावनावेग दाखवणे हे एक शिवधनुष्य आहे आणि नाना ते शिवधनुष्य लीलया पेलणारे नटसम्राट.

मेधा मांजरेकरांचा अभिनय नैसर्गिकपणे संयत आहे. एक फलंदाज षटकारामागे षटकार ओढत असताना अदर एंडला हा असा ग्रेस टिकवून ठेवायचा असतो. त्यांच्या तोंडचा "समोरचं ताट द्यावं पण बसण्याचा पाट देऊ नये" हे वाक्य संपूर्ण नाटकाची सेन्ट्रल थीम आहे. या दोन stalwarts समोर मांजरेकरांच्या व्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे आत्मविश्वासाने उभी राहिली आहे. इतर सर्व व्यवस्थित आहेत.
चित्रपट अजूनही बऱ्याच चित्रपटगृहात आहे. तडक जा आणि तिकीटं काढा.
सौमित्र

No comments:

Post a Comment