Wednesday, June 8, 2016

'B ' '4 ' U (बाबा, भ्रष्टाचार, ब्रॉडकॅस्टिंग आणि भारत)

Albert Einstein यांनी एकदा गांधीजी यांच्या बद्दल एक विधान केलं होतं, "Generations to come will scarce believe that such a one as this ever in flesh and blood walked upon this earth."

याची आठवण होण्याचं कारण म्हणजे अलीकडे हे जे आंदोलनं, सत्याग्रह, उपोषण वगैरे जे चालू आहे ते पाहून हे गांधीगिरी (?)चे असफल प्रयत्न वाटतात. आता हे वाक्य वाचून कुणाला असंही वाटू शकेल की असतात जगात काही निराशावादी माणसं ज्यांना चांगलं बघवत नाही त्यातलाच हा एक…
परवाची एक गोष्ट… बराच वेळ बस लागली नाही म्हणून शेजारच्या माणसाला विचारल कितीची बस आहे. तो म्हणाला 9.30 ची. वास्तविक 9.40 झाले होते. बरं बस समोर होती, ड्राइवर कंडक्टर समोर होते तरीही… वर तो माणूस म्हणाला, “ तो आतला जो मास्तर आहे ना तो हरामखोर आहे तो मुद्दाम सोडत नाही… वयस्कर आहे नाही तर मुस्काट फोडल असत.. त्याच्या वयाच्या माणसाने त्याला वाजवली की तो जागेवर येईल. मी त्याला म्हटलं त्याला वाजवण्याचा इश्यू आहे का फक्त? काही प्रॉब्लेम नाही… मी वाजवतो, तुम्ही फक्त चार जण सोबत या फक्त शांत उभे राहा काहीच करू नका, मी बघून घेतो … विश्वास ठेवा… टळटळीत उन्हात लोक (किमान 30 जण) त्या मास्तर ला शिव्या घालत उभे राहीले पण जागचा कुणी हलला नाही…मी प्रत्यक्ष जाऊन "वाचून" खात्री केली कि बस ९.४० चीच होती. ४५ ला सुटली FAIR ENOUGH ... हा किस्सा अतिशय प्रातिनिधिक आहे. मुळात आपला समाज विचाराने खूप VIOLENT आहे म्हणून सिनेमात FANTASY एव्हढी चालते पण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी कुल्ल्याला पाय लाऊन पळणारे जास्त आहेत. त्यांना हिरो हवा असतो, आता त्या माणसाला मास्तराच्या कानफटात मारायला (वास्तविक गरज नव्हती!) अण्णा हजारे हवे होते कि बाबा रामदेव? किती वेळ लागतो? चला काका मेमो दाखवा किव्वा SCHEDULE दाखवा मला CONFIRM करायचंय... संपला विषय.. पण नाही बोलबच्चन नाही तर आपल्याला अन्यायाची चीड आहे हे बाजूला उभ्या असलेल्या बायकांना कसं कळणार???

अण्णानवरून आठवलं... तुम्हाला आठवलं तर बघा... “IPL” संपायची वाट बघावी लागली होती त्यांना आंदोलन चालू करायला. देश इथेच गुढग्यावर येतो!.. राष्ट्राच चारित्र्य इथे ठरतं... मी LAW चा विद्यार्थी आहे पण मला कुणाही सुज्ञ मित्राने लोकपाल बिल मला इथे समजावून सांगावं... मला आनंद वाटेल. सत्ताधारी पक्षाशी असं आणि इतकं थेट वैर घेऊन बदल घडत नसतात. बिल पास करून घेणं म्हणजे कंपनीत व्हाऊचर पास करून घेणं नसतं. बरं CONSIDER करणार म्हटलं कि लावलं निम्बूझ तोंडाला .... विजय झाला ... कसला? घंट्याचा?! आपलं फ्रेमवर्क असं आहे कि इथे हुकुमशाही येणं शक्य नाही त्यामुळे खरंच काही चांगले उपाय असतील तर SIT ACROSS THE TABLE, DISCUSS, FORMULATE AND APPLY OR JUST BEGIN.

केंद्राचा कायदा येण्यापूर्वी आपल्या राज्यामध्ये माहिती अधिकार होता. निम्बूझ पिणाऱ्या किती जणांनी खरंच इज्जतीत वापर केला होता त्याचा?? शोक व्यक्त करायला, मेणबत्त्या पेटवायला, मानवी साखळी करायला सगळे पुढे. आम्ही शिपाई पण होणार आणि मुंडकं वर न काढताच गोळ्या सुद्धा मारणार...

रिक्षावाला “नीचे उतरो, नही जायेगा” म्हटला तर शंभरातले ४ जण नडतात, ४६ जण उतरून जातात आणि उरलेले ५० कुणी सपोर्टला येतंय का बघतात. हे प्रमाण ९६: २: २: असेल तर काही आशा आहेत.
आता बाबा रामदेव... काय गरज होती स्त्री चा पेहेराव करायची... घ्या ना करून ARREST. सत्याग्रह आहे ना? एका आठवड्यात आम्लेट? २१ दिवस उपवास करणारा गांधी नावाचा माणूस हटयोगी सुद्धा नव्हता?? पण विल पावर होती. दोन टोले मागून पडले तर योगी व्यक्तीने हे बोलावं कि पुढच्या वेळी सशस्त्र विरोध होईल? खरंच करणार? जमेल? नाही जमणार... पुन्हा रट्टे पडतील. आणि रट्टे हे कधी अण्णा, बाबा यांना पडत नसतात अनुयायांना बसतात. एक योग गुरु गुंडाळायला सिब्बलांना चार दिवस सुद्धा नाही लागले... गुंडाळता आलं हि नसतं जर... उद्दिष्ट पक्कं असतं तर.. म्हटले असते हा धरा बाबांनो मला.. कुठे कुठल्या काळ्या पाण्याची शिक्षा द्यायचीय ती द्या.. पण नाही.. सरळ सलवार कमीझ!

आता या सगळ्यामध्ये एक कॉमन धागा आहे.. मिडिया!!

मला खात्री आहे जर मिडिया चा रोल नसता तर याच्या पैकी एकसुद्धा आंदोलन झालं नसत. सगळ्यांना टेलीविजन वर झळकायला आवडतं... आणि खरचं आवडतं... फक्त कल्पना करा... काही सुद्धा BROADCAST होत नसताना ४२ आणि ४७ यशस्वी झालं. का माहित आहे? सभ्य भाषेत सांगायचं झालं तर अख्ख्या देशाची जळत होती... म्हणून एकजूट झाली होती.

“बदल तेव्हा घडतो जेव्हा जळते...” हात पाय तेव्हा जास्त जोरात मारले जातात जेव्हा पाणी डोक्याच्या वरून जातं. मानवजातीच्या इतिहासातील सर्व महत्वाच्या क्रांतीमधून याचा परिचय जगाला वारंवार आला आहे.

बॉस... आपला देश आहे यार, आपली मातृभुमी आपली आई आहे ... ज्यांना चीथावतो ते बीवीबच्चेवाले आपले बंधू आहेत. एव्हढी जाणीव सुद्धा पुरेशी आहे.

प्रत्येक व्यक्ती ... आणि प्रत्येक व्यक्ती... किमान स्वतःच्या आत्म्याशी जरी प्रामाणिक राहिला तर बाबा नकोत, अण्णा नकोत, मिडिया नको आणि ... गांधी सुद्धा नकोत...

@ सौमित्र २७ जून २०११

No comments:

Post a Comment